कोविड १९ ने सिध्द केलयं की कामगार आवश्यक आहेत, मालक नाहीत

जास्मिन डफ

मालकांची बुध्दिमत्ता आणि उद्योजकतेच्या भावनेमुळे समाज चालत नसून कामगारांच्या श्रमावर तो चालतो या मार्क्सवादी युक्तिवादाची भांडवलशाहीचे रक्षणकर्ते नेहमीच थट्टा करत आले आहेत. पण कोविड-१९ च्या साथीमुळे तयार झालेल्या परिस्थितीने मार्क्सच्या दाव्याचे सत्य हे स्पष्टपणे अधोरेखित केलंय. .

सध्याच्या निर्बंधांनुसार ज्यांचे कार्य आवश्यक मानले गेले आहे, ते कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बँकर, खाण अधिकारी किंवा त्यांची सेवा करणारे राजकारणी नाहीत. हे “तथाकथित संपत्ती निर्माते” आपल्या आलिशान बंगल्यांमध्ये काही महिने स्वतंत्रपणे वेगळे राहू शकतात ज्याचा समाजाच्या मूलभूत कार्यावर कोणताही परिणाम होत नाही हे आश्चर्य वाटण्यासारखेच अाहे.

बाकी त्यांच्याव्यतिरिक्त आम्हा उर्वरित लोकांसाठी हे जग जास्त चांगले आहे. ज्या लोकांवर आपण या संकटात सर्वात जास्त अवलंबून आहोत ते म्हणजे दैनंदिन जीवनात ज्यांच्या श्रमांवर आपण अवलंबून असतोः नर्स, शिक्षक, आपल्यासाठी अन्न पिकवणारे आणि ते बाजारापर्यंत घेऊन जाणारे, स्वतःच्या आरोग्याला धोका असूनही आपली अन्न आणि औषधांच्या दुकानांत  सेवा देणारे.

कान्टास कंपनी चे मुख्य कार्यकारी अधिकारी ऍलन जॉइस आणि खाण क्षेत्रातील वजनदार व्यक्ती गिना राईनहार्ट यांच्यासारखे कॉर्पोरेट मालक त्यांच्या अफाट संपत्तीस पात्र आहेत कारण त्यांची अर्थव्यवस्थेत विशेष भूमिका आहे असे आपल्याला सांगितले जाते. या दृष्टीकोनाचे वैशिष्ट्य म्हणजे फोर्ब्स स्तंभलेखक आणि “नेतृत्व धोरण” तज्ज्ञ रेनर झितेलमन यांनी २०१९ च्या लेखात केलेला याबाबत युक्तिवाद देताना म्हटलयं, “उच्च-स्तरीय व्यवस्थापकांपेक्षा खूपच जास्त पैसे कमावणाऱ्या, उद्योजगांचे उच्च उत्पन्न हे अनेकदा त्यांच्या चांगल्या कल्पनांंचे बक्षीस असते. ते लिहितात, उत्तम कल्पना असणारे लोकच जगातील सर्वात श्रीमंत लोक ते आहेत.

याप्रकारचा युक्तिवाद देणार्‍या विचारवंतांना आपल्याला पटवून द्यायच असतं की कामगार बिनमहत्त्वाचे आणि सहज बदलण्यायोग्य आहेत – भांडवलदारांच्या इच्छेनुसार शोषण करण्यासाठी असलेले “मानव संसाधन” याशिवाय त्यांची या जगात कुठलीही किंमत नाही. त्यांना वाटतं की तुम्ही कामगार आहात कारण मोठ्या पदांवर जाण्यासाठी लागणारी हुशारी, कल्पनाशक्ती आणि इच्छाशक्ती  तुमच्याकडे नाही. यामुळेच कमी पगार, नोकरीतील कमकुवत सुरक्षा, अत्यंत कमी अनुदान असलेल्या शाळांमधील खराब शिक्षण आणि चांगल्या स्वास्थ्य सुविधांचा अभाव यालाचं तुम्ही पात्र आहात.

कोविड -१९ च्या संकटाने ह्या युक्तिवादाच्या चिंधड्या केल्या. कामगारांना घरी राहावे लागत असल्याने वैश्विक अर्थव्यवस्था ठप्प झाल्यासारखी आहे. बंगल्यांमध्ये राहणारे कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी परिस्थिती वाचवण्यासाठी काहीही करू शकत नाहीयेत. त्यांची सर्व सर्जनशीलता आणि बुद्धिमत्ता ही त्यांची संपत्ती ज्या श्रमशक्तीवर उभी केली गेली होती त्याशिवाय ती निरुपयोगी आहे.

आपल्या राजकीय नेत्यांची कृती याला दुजोरा देतात. दीर्घ मंदीची शक्यता रोखण्यासाठी त्यांनी अतिशय हुशारीने केलेली गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त कामगारांना त्यांच्या पदावर ठेवले – आपल्या आरोग्याची बेपर्वाई करून त्यांच्या भांडवलदार मालकांच्या नफ्याचे संरक्षण करण्यासाठी. (ऑस्ट्रेलियाचे) प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी २४ मार्च रोजी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की “सर्व अनावश्यक कामगार घरी पाठवले जातील.  या अर्थव्यवस्थेत नोकरीत असलेला प्रत्येकजण आवश्यक कामगार आहे.”

मॉरिसनने म्हटल्या प्रमाणे सध्याच्या परिस्थितीत सेवेत असलेले मग ती नर्स असो किंवा डॉक्टर असो किंवा शाळाशिक्षक असो किंवा आपल्या मध्यवर्ती कार्यालयांमध्ये आम्हाला आणखी अधिक क्षमता मिळू शकेल हे पाहणारे सरकारी नोकरदार असोत, नवीन व्यवस्थेअंतर्गर कॉल सेंटरमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत काम करणारे कर्मचारी असोत, हे सर्व आवश्यक रोजगार आहेत.

जेव्हा समाजाच्या मुलभुत गरजा भागवण्याची गरज असते, तेव्हा ऍलन जॉइस आणि गिना राईनहार्ट हे आवश्यक नसतात, अकुशल कामगार आवश्यक असतात. कामगारांशिवाय भांडवलदारांचं अस्तित्वचं नाही.

मार्क्सच्या लिखाणात याचचं वर्णन भांडवलशाहीची कबर खोदणारा हा कामगार वर्ग असतो असं आलं आहे. समाजासाठी कामगार वर्ग हेचं इंजिन असतं. जेव्हा कामगार वर्ग काम करायचं थांबतो, तेव्हा समाज ठप्प होतो.

कोविड १९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत याची बरीच उदाहरणं आपण बघितली आहेत. इटलीमध्ये  कार आणि धातू उद्योगांतील हजारो कामगारांनी सामाजिक अंतराच्या (Social Distancing) अंमलबजावणी साठी संप पुकारला आणि रस्त्यावर उतरले – प्रधानमंत्री ज्युसेप्पे कॉन्टे यांच्यासाठी कामगारांनी स्वत:चे आणि परिवाराचे आरोग्य धोक्यात घालण्यास नकार दिला. कॉन्टे ने कोविड १९ मुळे १०% मृत्यू दर असून सुद्धा नफ्याचा ओघ चालू ठेवण्यासाठी १४ मार्चला ट्वीट केले – इटली कधीच थांबत नाही. पण कामगारांचा विचार दुसराच होता.

पोलीसांसाठी गणवेश बनवणारा कारखाना २०१७ मध्ये कामगारांनी अर्जेंटिनामध्ये आपल्या हाती घेतला होता, त्यामध्ये सध्या सर्जिकल मास्क बनवले जात आहेत. अर्जेंटिनामधील कामगारांनी ताब्यात घेतलेल्या लॅटिन अमेरिकेमधील सर्वात मोठ्या प्रिटींग प्रेस मध्ये 3D संरक्षक मास्क आणि सॅनिटायझर (Hand Sanitiser) चे सध्या उत्पादन होत आहे.

ऑस्ट्रेलियामध्येपण मेलबर्नजवळील कोल्स कंपनीच्या कोठारातील कामगारांनी २७ मार्चच्या सकाळी व्यवस्थापनाने गरजेइतकी संरक्षणातत्मक उपकरणे न दिल्याने त्याविरोधात काम थांबवलं. या कामगारांची शक्ती जबरदस्त आहे. २०१६ मध्ये या कामगारांनी केलेल्या फक्त तीन दिवसांच्या संपाने व्हिक्टोरिया आणि तास्मानियाच्या सुपरमार्केट्स मध्ये बरेच आठवडे मालच नव्हता.

कामगारांकडे इतकी शक्ती आहे की भांडवलदारांकडून त्यांच्या कौश्यल्याचे होणारे शोषण ते थांबवू शकतात. मालक नसलेल्या जगात आपण सगळ्यांच्या भल्यासाठी सगळे निर्णय एकत्रितपणे आणि लोकशाही पध्दतीने ठरवू शकतो. उदाहरणार्थ अन्नाचे वाटप माणसाच्या गरजेनुसार केले जाऊ शकते.  संपूर्ण जगाला दीडवेळेला पुरेल इतके अन्न असूनसुद्धा जिथे लाखो लोक उपाशी असतात अशा     भांडवलशाहीत अस्तित्त्वात असलेल्या क्रूर वास्तव्याचा अंत होईल.   

आज जे श्रीमंतांसाठी सतत लक्झरी अपार्टमेंट्स आणि शॉपिंग मॉल्स बांधले जात आहेत त्याऐवजी, आपण बांधकाम कामगार म्हणून आपल्या कौशल्यांचा उपयोग वेगाने रुग्णालये तयार करण्यासाठी करू शकू – जेणेकरून भविष्यातील आरोग्याच्या संकटात कोणालाही बेडशिवाय जाण्यास भाग पाडले जाणार नाही.

कामगार वर्गाची एकता, लोकशाही आणि सामूहिकता हाच समाजवादाचा पाया आहे. समाजवाद हा असा समाज आहे ज्यात मूठभर श्रीमंत भांडवलदारांच्या नफ्याच्या हितासाठी समाज चालवण्याऐेवजी कामगार आपली सर्व कौशल्ये आणि सर्जनशीलता वापरून आपण कोणत्या प्रकारच्या जगात जगायचे आहे याचा लोकशाही पद्धतीने निर्णय घेऊ शकतात. . . भांडवलदारांना आपली गरज आहे. आपल्याला त्यांची नाही.

सध्या भांडवलशाही संकटात आहे. कामगार आतापर्यंत कधी नव्हते इतके जास्त शक्तीवान आहे पण तरीही आपल्याला दररोज अजून जास्त हिंसक परिस्थितीमध्ये ढकलले जात आहे. जर्मन क्रांतिकारक रोजा लक्समबर्गर्गने पहिल्या विश्वयुध्दात ऐतिहासिक कत्तल झाली त्यावेळी म्हटल्याप्रमाणे सध्या अशी परिस्थिती आहे की समाज “एकतर समाजवादाकडे संक्रमण करेल किंवा बर्बरतेकडे अधोगती करेल. ” 

दररोज भांडवलदारांच्या नफ्यासाठी पर्यावरणाचा किंवा माणसाच्या आरोग्याचा विध्वंस केला जातोय. समाजवादी भविष्यासाठी समाजाला संघटित करण्याची यापेक्षा जास्त गरज याआधी कधीही  नव्हती.

(जास्मिन डफ ऑस्ट्रेलियाच्या अग्रगण्य समाजवादी प्रकाशन रेड फ्लॅगसाठी लिहितात.)

(हा स्वैर मराठी अनुवाद आहे. इंग्रंजी लेख https://janataweekly.org/covid-19-proves-workers-not-bosses-are-essential/ हा आहे.)

Janata Weekly does not necessarily adhere to all of the views conveyed in articles republished by it. Our goal is to share a variety of democratic socialist perspectives that we think our readers will find interesting or useful. —Eds.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Email
Telegram

Contribute for Janata Weekly

Also Read In This Issue:

If you are enjoying reading Janata Weekly, DO FORWARD THE WEEKLY MAIL to your mailing list(s) and invite people for free subscription of magazine.

Subscribe to Janata Weekly Newsletter & WhatsApp Channel

Help us increase our readership.
If you are enjoying reading Janata Weekly, DO FORWARD THE WEEKLY MAIL to your mailing list and invite people to subscribe for FREE!