महामारी: साथीचा रोग पसरण्याचा दोष विषाणू व्यतिरिक्त मोठ्या बँका आणि मोठया कृषी व्यवसायाचा कसा?

– स्टुअर्ट हीव्हर

कोविड -१९ मुळे होणाऱ्या परिणामाला चीन दोषी असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत आहेत मात्र हा दावा दांभिक आणि दिशाभूल करणारा आहे, असे मत जीवउत्क्रांती शास्त्रज्ञ आणि ‘बिग फार्मस् मेक बिग फ्लू’ या पुस्तकाचे लेखक रॉब वालेस यांनी मांडले. मी एक तंदुरुस्त मध्यवयीन व्यक्ती असूनही कोरोनामुळे श्वास घेण्यासाठी तडफडतोय तेही ट्रम्प यांच्यामुळेच असंही ते म्हणाले. मिनेपोलिस येथे त्यांच्या राहत्या घरीच औषधोपचार चालू असताना व्हायरसतज्ज्ञ रॉब वालेस बोलत होते की कोविडं-१९ किंवा अन्य रोगविषाणूंवर होण्याऱ्या दोषारोपणाबरोबरच काही अंशी बहुराष्ट्रीय कृषी व्यवसायाच्या कृतीही कारणीभूत आहेत ज्या ट्रम्प प्रशासनाच्या छत्रछायेखाली आहेत.

अर्थातच ट्रम्पचे म्हणणे एका अर्थाने बरोबरही आहे कारण सार्स-कोविड २ हा वुहान मध्ये नाही पण मध्य किंवा दक्षिण चीन मध्ये उपन्न झाला हे जवळजवळ नक्की आहे, आणि नेचर मेडिसिनमध्ये आलेल्या अलीकडील लेखानुसार प्रयोगशाळेत नाही. चीनमध्ये  मूळ असलेल्या रोगविषाणूच्या निर्मितीला चीन जरूर जबाबदार असेल पण एकट्या  चीनचा दोष नक्कीच नाही असेही वॉलेस म्हणाले.  जर दोषारोपांचा खेळ खेळायचाच असेल तर १९८० च्या दरम्यान सुरू झालेल्या जागतिक अन्न उत्पादनाच्या पायाभूत रचनात्मक बदलाचा आढावा घेणे गरजेचे आहे, ज्यांनी अशा विषाणूंना जन्माला घालण्याची सुरुवात केली, ज्यांच्यात जगाला महामारीच्या विळख्यात अडकून ठेवण्याचे सामर्थ्य आहे. यालाच वॉलेस महामारीचा ‘द परफेक्ट लेयर केक’ म्हणतात. चीन या क्रांतीच्या केंद्रस्थानी होता. याच क्रांतीचा एक भाग म्हणजे खुले आर्थिक धोरण आणि विशेष आर्थिक झोनची निर्मिती ज्याने मोठ्या प्रमाणावर थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित केली, जी पुढे शहरीकरण आणि आर्थिक वृद्धी घडवून आणण्यास सहाय्यक ठरली. 

 हा या आर्थिक वृद्धीचाच एक भाग आहे की चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या  पदाधिकाऱ्यांनी अमेरिकन बँका आणि गुंतवणूक संस्थांशी  हातमिळवणी केली – आणि याला मदत होती ती हाँगकाँग मधील वित्त मध्यस्थांची –  आणि औद्योगिक-कारखाना शेती वाढीस लागली. याच्या वाढीचा वेग अभूतपूर्व होता.

मनुष्य वस्तीत रोग प्रसार  कसा आणि किती सहजतेने होतो हे खालील बाबींवरून लक्षात येईल, ठराविक प्रकारचे प्राणी जे छोट्याश्या खुराड्यात ठेवले जातात ज्यांची निसर्गतः प्रतिकार शक्ती आणि आयुर्मान कमी असते, (बॉयलर कोंबडी -४० दिवस) त्यांना विशिष्ट प्रकारचे औषध देऊन कत्तलीसाठी वाढवलं जातं आणि बारा महिने त्यांची कत्तल  केली जाते आणि जेव्हा वन्य प्राणी फॅक्टरी-शेती केलेल्या प्राण्यांच्या जवळ येतात तेव्हा ते रोगप्रसारचे भांडार ठरते आणि शेती कामगारांमार्फत ते वस्त्यांमधील इतर माणसांपर्यंत पोहोचतात.

“याप्रकारे असंख्य रोगजंतू मानवी कार्यक्षेत्रांत संक्रमण होऊन जगाच्या या टोकापासून त्या टोकापर्यन्त पसरतात.” असं वॉलेस यांचं म्हणणं आहे.  ते पुढे म्हणतात,

“अमेरिकेत, मोठ्या ऍग्रि-बिझनेस (औद्योगिक पातळीवर शेती करणाऱ्या कंपन्या), मोठ्या औषध कंपन्या आणि हत्यारांच्या कंपन्या यांचे हितसंबंध एकामेकांशी जोडलेले आहेत, आणि त्यांना जपण्यासाठी ते आपल्या पैशाचा राजकीय प्रभाव वापरून देशाचं धोरण ठरवतात. सरकार या धंद्यांना अभय देतं. एकप्रकारे, रोगविषाणूंच्या बाजूने जगातले सर्वात मोठे वकील लढत आहेत.”

बरेच शास्त्रज्ञ प्राण्यांपासून होणाऱ्या रोगांमध्ये महामारीत रूपांतर होण्याची ताकद आहे यावर लक्ष केंद्रित करतात. यावर प्रोफेसर बेन कावलिंग जे सध्या हाँगकाँग विद्यापीठात रोगतज्ज्ञ आहेत ते म्हणतात की,  प्राण्यांपासून निर्माण होणारे सर्वच विषाणू चीन मध्ये उत्पन्न होतात असे नाही.  पण हाँगकाँग मधील शास्त्रज्ञ पक्षी, डुक्कर यांच्याशी निगडित गोष्टींशी जास्त जवळीकतेने विचार करतात, कारण मांसबाजार किंवा शेती या ठिकाणी लोक आणि पशुपक्षी एकमेकांच्या जास्त जवळ असतात.

अशा परिस्थितीत माणसांना रोगजंतूने संक्रमित होण्याची शक्यता असते आणि यातून पुढचा एखादा (उदा: H7 N9 सारखा) महामारीजन्य विषाणू निर्माण होण्याचा धोका संभवतो.

वॉलेस यांच्या निरिक्षणाप्रमाणे, अॉगस्ट २००८ मध्ये गोल्डमन शाचस यांनी चीनमधील ३०० दशलक्ष डॉलर्सच्या १० हून अधिक पोल्ट्री फार्मचे पूर्ण नियंत्रण मिळवले. न्यूयार्क मधील लोक ज्या महामारीने त्रस्त आहेत त्याला ही प्रसिद्ध स्थानिक कंपनी नकळतपणे कारणीभूत असल्याचे ते म्हणतात –  ही क्रूर अशी विडंबना आहे. असे का तर? गोल्डमन शाचसने पारंपरिक छोटे व्यवसाय संपवले आणि मग वटवाघूळ आणि उदमांजरा सारखे विचित्र प्राण्यांचा संचय करून मांस बाजारपेठेद्वारे शहरापर्यंत पोहचवले.

ट्रम्प आणि महामारी

महामारी पसरवण्यासाठी एकट्या चीनला दोषी ठरवणं हे ट्रम्पच वागणं फक्त दिशाभूल करणार नाही तर ढोंगी आहे: अमेरिकेत, मोठ्या ऍग्रि-बिझनेस (औद्योगिक पातळीवर शेती करणाऱ्या कंपन्या) मोठ्या औषध कंपन्या आणि हत्यारांच्या कंपन्या, यांचे हितसंबंध एकामेकांशी जोडलेले आहेत, आणि त्यांना जपण्यासाठी ते आपल्या पैशाचा राजकीय प्रभाव वापरून देशाचं धोरण ठरवतात. सरकार या धंद्यांना अभय देतं. एकप्रकारे, रोगविषाणूंच्या बाजूने जगातले सर्वात मोठे वकील लढत आहेत. 

अमेरिकेन कर्मचाऱ्यांना कामावर परत आणून  ट्रम्प खरेतर चीनी मालकीच्या शेती कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीचे रक्षणच करत होते – अशी कंपनी जी महामारी पसरवण्यासाठी काही अंशी कारणीभूत असल्याचे वालेस आणि इतर काही जण समजतात.

२९ एप्रिल रोजी ट्रम्प यांनी  संरक्षण उत्पादन कायदा लागू करून कर्मचाऱ्यांना सक्तीने कामावर परत बोलावून घेतले, तेव्हा अमेरिकन स्मिथफिल्ड अन्न महामंडळाने सुद्धा या निर्णयाचे समर्थन केले. त्यातील काही प्लांट कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणूनही नोंद केले गेलेले होते. परंतु २०१४ पासून स्मिथफिल्ड चीनी मालकीच्या बहुराष्ट्रीय डब्लू एच ग्रुप चा भाग आहे जी हाँगकाँगच्या शेयर बाजार सूचीमध्ये आहे.

२४ मार्चला, हाँगकाँगमध्ये, डब्लू एच ग्रुपने २४.१ अब्ज डॉलर्स एवढी विक्रमी कमाई  घोषित केली, जी आइस्लँड  या देशाच्या एकूण देशांर्गत उत्पादनाच्या (GDP) एवढी आहे.

कोरोना, एव्हियन, स्वाईन फ्लू यातील कोणताही प्राणिजन्य विषाणू सामान्य जनतेला अर्थातच घाबवणारा आहे , पण रोगाचा प्रादुर्भाव हा कृषी व्यवसाय मॉडेलचा स्वीकारलेला भाग आहे. या रचनेमध्ये जेव्हा संक्रमण नियंत्रणाच्या बाहेर जाऊन माणसे आणि आणि प्राणी मारतात तेव्हा त्याचा गोंधळ नीट करण्याची जबाबदारी सरकारच्या डोक्यावर येते  

वस्तुतः विचार करता हे गोंधळ व्यवसायाला पूरक असतात. टायसन या आणखी एका बहुराष्ट्रीय खाद्य महामंडळाने मागच्या तीन महिन्यात १०.८२  अब्ज डॉलर्सची विक्री केल्याचा तपशील आहे आणि माध्यमांशी त्याचा खुलासा करताना ते म्हणाले की, आफ्रिकन स्वाईन ज्वर विषाणू (African Swine fever virus किंवा ASFV) ची याला मदत झाली.  ज्याचा परिणाम असा झाला की चीनमधील उत्पादकांनी कोट्यावधी डुकरांना कापले. ( हा स्वाईन-फ्लू पासून निराळा रोग आहे)

सीईओ नोइल व्हाईट हे फॉक्स बिझिनेसशी बोलताना म्हणाले की ASFV चे परिणाम “अात्ता कुठे दिसू लागले आहेत”, पण टायसन मांस आणि पोर्क कंपनीचा धंदा सुरळीत चालू आहे.

 जगाने कोरोनावर लक्ष केंद्रित केले असताना दुसरीकडे शेतीव्यवसायातून रोग विषाणू निर्माण होतोय आणि प्रसारमाध्यमात त्याची चर्चा नाही. दोन महिन्यात एव्हियन फ्लूच्या प्रसाराच्या  ४३ घटनांनंतर व्हिएतनाम मध्ये मार्च महिन्यात १,३७,००० पोल्ट्री नष्ट झाल्याचा अहवाल समोर आला. 

चुका करू नका, रोगप्रचार आणि प्रसार हे एकमेकांशी निगडित-एकामागून एक येणारे आहेत. त्याने फक्त आपण संक्रमित होतो एवढेच नाही तर आपण करत असलेल्या गोष्टींचं ते फलित असत असं मत “Spillover: Animal Infection And Next Human Pandemic” चे लेखक डेव्हिड क्युमेन यांनी मांडलं.

अमेरिकेचे बहुराष्ट्रीय अन्न महामंडळ हे सुद्धा प्राण्यांपासून होणाऱ्या जीवघेण्या महामारीचा अपरिहार्य असा भाग आहेत हे सत्य आहे. पण याचा ट्वीट ट्रम्प लवकर करतील असे कुठलेही चिन्ह दिसत नाहीत.

ट्रम्पनी चीनला दोष देणं हा ढोंगीपणा नसून ते नाटक आहे असं वालेस म्हणतात.

(माजी नैासेना अधिकारी स्टुअर्ट हीव्हर हे पूर्णवेळ लेखक आणि पत्रकार आहेत. ते हाँगकाँग येथे राहतात.)

(हा लेखाचा मराठी स्वैर अनुवाद पुजा नायक यांनी केला आहे. इंग्रजी लेख https://janataweekly.org/pandemic-how-big-banks-and-big-ag-share-blame/ हा आहे.)

Janata Weekly does not necessarily adhere to all of the views conveyed in articles republished by it. Our goal is to share a variety of democratic socialist perspectives that we think our readers will find interesting or useful. —Eds.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Email
Telegram

Contribute for Janata Weekly

Also Read In This Issue:

If you are enjoying reading Janata Weekly, DO FORWARD THE WEEKLY MAIL to your mailing list(s) and invite people for free subscription of magazine.

Subscribe to Janata Weekly Newsletter & WhatsApp Channel

Help us increase our readership.
If you are enjoying reading Janata Weekly, DO FORWARD THE WEEKLY MAIL to your mailing list and invite people to subscribe for FREE!