कोविड १९ ने सिध्द केलयं की कामगार आवश्यक आहेत, मालक नाहीत
जास्मिन डफ मालकांची बुध्दिमत्ता आणि उद्योजकतेच्या भावनेमुळे समाज चालत नसून कामगारांच्या श्रमावर तो चालतो या मार्क्सवादी युक्तिवादाची भांडवलशाहीचे रक्षणकर्ते नेहमीच थट्टा करत आले आहेत. पण कोविड-१९ च्या साथीमुळे तयार झालेल्या परिस्थितीने मार्क्सच्या दाव्याचे सत्य हे स्पष्टपणे अधोरेखित केलंय. . सध्याच्या निर्बंधांनुसार ज्यांचे कार्य आवश्यक मानले गेले आहे, ते कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बँकर, खाण अधिकारी…