मॅल्कम एक्स: एका मानवाधिकार कार्यकर्त्याची समाजवादाकडे वाटचाल

ग्लोरिया वर्डीयू

कोविड – १९ महामारी नसती तर, १९ May मे २०२० रोजी आपण मॅल्कम एक्सचा ९५ वा वाढदिवस साजरा करीत असतानाच, शेकडो आणि हजारो लोक “अहमाऊड आर्बेरी आणि ब्रेओना टेलर ला न्याय हवा!” अशा घोषणा देत रस्त्यावर उतरले  असते. जसे आम्ही उतरलो होतो २००६ मध्ये सीन बेल साठी; २००९ मध्ये ऑस्कर ग्रॅण्ट साठी; २०१२ मध्ये ट्रेव्हॉन मार्टिन, जॉर्डन डेव्हिस, रॅमर्ले ग्रॅहॅम आणि ऍलन  ब्ल्यूफोर्ड साठी; २०१३ मध्ये मरियम कॅरीसाठी; २०१४ मध्ये तामीर राईस, मायकेल ब्राउन, डोंत्रे हॅमिल्टन आणि लॅक्वान मॅकडोनल्ड साठी; २०१५ मध्ये फ्रेडी ग्रे आणि डोनाल्ड डोन्ते आयव्ही साठी; अल्फ्रेड ओलंगो साठी २०१६ मध्ये; अलाह जेनकिन्ससाठी २०१८ मध्ये; २०१९ मध्ये डेनिस कॅरोलिनोसाठी आणि असेच कित्येक प्रसंग.

आमच्याकडे आमच्या मागण्यांची यादी असलेली चिन्हे असत: “ब्रेनोना टेलर आणि अहमाद आर्बरी यांच्यासाठी न्याय”, “पोलिसांची क्रूरता थांबवा”, “पोलिसांवर जनतेचे नियंत्रण” आणि “खूनी पोलिसांना तुरंगवास”.

१९५७ मध्ये माल्कम एक्सने जेव्हा न्यूयॉर्कमधील एका पोलिस ठाण्यामध्ये हस्तक्षेप केला, तेव्हा अशाच मागण्या केल्या होत्या. नेशन ऑफ इस्लाम (NOI) चा सदस्य असलेल्या जॉन्सन एक्स हिंटन याला दोन पोलिसांनी बेदम मारहाण केली आणि अटक केली होती. या क्रौर्याचा शब्द हार्लेममध्ये त्वरीत पसरला. संतप्त रहिवासी न्याय मागण्यासाठी पोलिस ठाण्यात दाखल झाले.

मॅल्कम एक्सने, NOI ची स्व-संरक्षण युनिट, “The Fruit of Islam”, एकत्र केली, जिने सुव्यवस्था राखण्यासाठी स्वतःला सज्ज केले. जॉन्सन एक्सच्या दुखापतींमुळे मॅल्कमला धक्का बसला आणि त्याने (जॉन्सनला) त्वरित वैद्यकीय मदत मिळावी, अशी मागणी केली. एक रूग्णवाहिका आली आणि त्या पाठोपाठ २००० हून अधिक लोकांची गर्दी पायीच रुग्णालयापर्यंत येऊन ठेपली.

जेव्हा मॅल्कमची खात्री पटली की हिंटनची काळजी घेतली जात आहे, तेव्हा मॅल्कमने रुग्णालयातून बाहेर येऊन नुसती हाताने खूण करताच, लोक तेथून पांगले. जमावावर त्याचं नियंत्रण पाहून एका पोलिस निरीक्षकाने टिप्पणी केली: “कोणाकडेही अशी शक्ती असू नये.” याचा खरा अर्थ होता, “कोणत्याही काळ्या माणसापाशी अशी शक्ती असू नये.”

जॉन्सन एक्स बचावला, परंतु त्याला मेंदूच्या अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आणि डोक्यात एक धातूची प्लेट घालूनच जगावे लागले. त्याने न्यूयॉर्क पोलिस विभागाविरुद्ध गुन्हा दाखल केला. एका “सर्व-गोरे” ज्युरीने त्याला ७०,००० डॉलर नुकसानभरपाई जाहीर केली, त्यावेळची न्यूयॉर्क शहरातील पोलिस क्रौर्याची सर्वात मोठी नुकसान भरपाई.

संघर्षात मुळे

मॅल्कम लिटिलचा जन्म १ मे १९२५ रोजी नेबमधील ओमाहा येथे झाला. एका मुलाखतीत मॅल्कमची बहीण एला कॉलिन्स म्हणाली होती, “जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा आम्हाला मॅल्कम कडून मोठ्या गोष्टींची अपेक्षा होती. त्याच्या कुटुंबाने त्याला विशिष्ट वर्गात ठेवले या वस्तुस्थितीचा त्याच्यावर प्रभाव पडला की नाही, हे मला माहित नाही. ”

त्याची आई, कॅरेबियन मधील ग्रॅनाडा देशातील लुईस नॉर्टन लिटल, आणि वडील, अर्ल लिटल, ब्लॅक राष्ट्रवादी मार्कस गार्वे यांचे स्पष्ट समर्थक होते. या कुटुंबात आठ मुले होती.

अर्ल लिटिलच्या नागरी हक्क लढ्यातील सक्रियतेमुळे त्यांना ब्लॅक लिजन नावाच्या गोऱ्या वर्चस्ववादी संघटनेने मारण्याची धमकी दिली, व त्यांच्या कुटुंबाला मॅल्कमच्या चौथ्या वाढदिवसापूर्वीच दोन वेळा स्थलांतर करण्यास भाग पाडले. वयाच्या १३ व्या वर्षापर्यंत मॅल्कमने आपले घर जळलेले पाहिले होते, वर्णद्वेष्ट्यांकडून वडिलांच्या हिंसक मृत्यूच्या सामोरे जावे लागले होते आणि आपल्या आईची दिवसेंगणिक होणारी कोलमडही पाहिली होती.

नातेवाईकांच्या, इतर लोंकाच्या घरांमध्ये अनेक वर्षे घालविल्यानंतर तो बोस्टनमध्ये आपली बहीण एला कॉलिन्सबरोबर राहायला गेला.                                                                           

आठव्या इयत्तेत असताना शिक्षकांनी त्याला, काय व्हायचे आहे असे विचारले असता मॅल्कमचे उत्तर “वकील” असे होते. या शिक्षकाने काळ्या लोकांच्या इतिहासाचा अभ्यास केला नसाव, नाहीतर त्याने मॅल्कमच्या वकील बनण्याच्या महत्वाकांक्षेला उत्तेजन दिले असते.

किशोरवयात असताना, मॅल्कमने आपल्या मित्रांमधील आवडीनिवडींचा शोध घेतला. त्यात त्याला झूट सूट घालणे, व केस गोऱ्या माणसांसारखे दिसण्यासाठी टाळू जाळणे यासारखे प्रकार आढळले.

जानेवारी १९४६ मध्ये मॅलकमला बोस्टनमध्ये अटक करण्यात आली. त्याच्यावर चोरी, जबरदस्तीने प्रवेश करणे,  आणि बंदुक बाळगणे, असे आरोप ठेवले गेले. त्या फेब्रुवारीत त्याने चार्ल्सटाउन कारागृहात तुरुंगवासाची शिक्षा सुरू केली. तुरूंगातील ग्रंथालयात त्याने वाचन सुरू केले.

एला कॉलिन्स यांनी मॅल्कमच्या तुरुंगवासाच्या काळाबद्दल असे म्हटले होते: “वास्तविकतेच्या दृष्टीकोनातून, मला वाटते की त्याने तारुण्यात, त्याच्या वातावरणापासून घेतलेला सर्व भ्रम, तुरुंगातच हरवले. मला वाटते की त्याने वास्तविक आयुष्य पाहिले. मॅल्कमने आयुष्यात मिळवलेल्या सर्वात मौल्यवान संपत्तीपैकी एक म्हणजे धैर्य. ”

१९४७ मध्ये एलिजा मुहम्मद यांच्या शिकवणुकीपासून त्याचे नेशन ऑफ इस्लाम (NOI) अंतर्गत धर्मांतर सुरू झाले. १९५२ मध्ये माल्कमला पॅरोल करण्यात आले आणि मग NOI कडून “एक्स” हे नाव मिळाले.

जेव्हा कृष्णवर्णीय लोकांवर रस्त्यावर मारहाण केली जात होती, जाहीरपणे अपमानित केले जात होते आणि ठार मारले जात होते, तेव्हा मॅल्कम एक्स त्यांच्यासाठी उभा राहिला. त्याला समजले की रस्त्यावर आणि तुरूंगात राहणाऱ्या लोकांकडून योगदान शक्य आहे. मुमिया अबू-जमाल प्रमाणेच हा सुद्धा बेरोजगार, बेघर आणि गळचेपी झालेल्यांसाठी बोलत राहिला.

कृष्णवर्णीयांचे ऐक्य

१९५३ ते १९६४ या काळात मॅल्कम एक्सन NOI मंत्री पदावर आरूढ झाला आणि देशभरात यशस्वीरित्या नवीन मस्जिदी स्थापन केल्या. १९६४ च्या सुरुवातीच्या काळात, मॅल्कम एक्सने नेशन ऑफ इस्लामपासून विभक्त होण्याची घोषणा केली.

मार्च १९६४ मध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत मॅल्कमने काळ्यांच्या ऐक्यावर भाष्य केले: “गोरे आम्हाला मदत करू शकतात, पण ते आमच्यात सामील होऊ शकत नाहीत. प्रथम कळ्यांचे थोडेतरी ऐक्य होईपर्यंत कोणतीही कृष्ण-धवल एकता होऊ शकत नाही. प्रथम थोडीतरी वांशिक एकता येईपर्यंत कामगारांची एकता होऊ शकत नाही. आपण प्रथम आपसात एकत्र येईपर्यंत इतरांशी एकत्र येण्याचा विचार करू शकत नाही. आपण स्वत:ला प्रथम मान्य केल्याशिवाय इतरांना मान्य होण्याचा विचार करू शकत नाही. ”

एप्रिल १९६४ मध्ये मॅल्कम एक्सने आपल्या विस्तारित परदेश दौर्‍यासाठी अमेरिका सोडली. त्यांनी इजिप्त, लेबनॉन, सौदी अरेबिया, नायजेरिया, घाना, मोरोक्को आणि अल्जेरिया यांना भेट दिली. प्रत्येक मुसलमान पूर्ण करू इच्छितो अशी ती यात्रा त्यांनी मक्का येथे केली, ज्यामुळे त्यांना हज मलिक अल शाबाज हे नाव वापरता आले.

त्यांनी सनातनी इस्लामच्या प्रतिनिधींशी आपले संबंध दृढ केले, विद्यार्थी, पत्रकार, संसद सदस्य, राजदूत आणि सरकारी नेत्यांशी भेट घेतली आणि अमेरिकेतील वांशिक समस्येबद्दल बोलत राहिला. त्याचा सर्व वंशातील लोक आणि सर्व प्रकारच्या अत्याचारा विरुद्ध लढणाऱ्या अनेक लोकांशी संबंध आला. तो कळ्यां बरोबरच गोर्यांशी देखील बोलत असे.

मॅल्कम यांनी परदेशातून, घानातून, लिहिलेल्या एका पत्रामध्ये, ज्याला त्याने पॅन-आफ्रिकनतेचा मुख्य आधार म्हटले आहे – म्हटले, “सर्व आफ्रिकन-अमेरिकन लोक जगाच्या पॅन-आफ्रिकीवाद्यांचा अविभाज्य भाग होण्याची वेळ आली आहे, आणि जरी आपण घटनेने आपल्याला हमी दिलेल्या फायद्यांबाबत लढा देत असताना, शारीरिकरित्या अमेरिकेत असू, आपण तात्विक आणि सांस्कृतिकदृष्ट्या आफ्रिकेला ‘परतावे’ आणि पॅन-आफ्रिकीवादाच्या चौकटी अंतर्गत एकता विकसित करावी. ”

अमेरिकेत परतल्यानंतर २ May मे, १९६४ रोजी मॅल्कम न्यूयॉर्कमधील एका समाजवादी व्यासपीठावर बोलला: “ते म्हणतात की प्रवास आपली व्याप्ती वाढवितो आणि अलीकडेच मला मध्य-पूर्वेत आणि आफ्रिकेत तो बराच करण्याची संधी मिळाली. मी प्रवास करत असताना माझ्या लक्षात आले की नुकतेच स्वातंत्र्य प्राप्त झालेले बहुतेक देश तथाकथित भांडवलशाही व्यवस्थेशी विमुख होऊन समाजवादाच्या दिशेने चालत आहेत. म्हणूनच जिज्ञासामुळे मी जिथे जिथे हे विशिष्ट तत्वज्ञान अस्तित्वात आहे किंवा अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, तेथे थोडासा शोध घेण्याच्या मोह आवरू शकत नाही.

 “आज वसाहतवादाच्या बंधनातून उदयास आलेले सर्व देश समाजवादाकडे वळत आहेत. हा अपघात आहे असे मला वाटत नाही. “

साम्राज्यवादाशी लढा

२८ जून, १९६४ रोजी मॅल्कमने, आपल्या शेजारी अस्तित्वात असलेल्या सर्व नकारात्मक राजकीय, आर्थिक आणि सामाजिक परिस्थितींशी लढण्यासाठी, “ऑर्गनायझेशन ऑफ अफ्रो-अमेरिकन युनिटी (ओएएयू)” ही निधर्मी संस्था स्थापन केल्याची घोषणा केली.

नंतर १९६४ मध्ये मॅल्कमने पाच महिने मध्य पूर्व आणि आफ्रिकेचा दौरा केला. जुलैमध्ये कैरो येथे झालेल्या आफ्रिकन ऐक्य शिखर परिषदेच्या दुसऱ्या बैठकीला तो उपस्थित होता. परिषदेला  हजर राहण्याची परवानगी मिळालेला तो एकमेव उत्तर अमेरिकी होता, व त्याने अमेरिकेतील २० दशलक्ष आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या दुर्दशेवर एक प्रबंध देखील सादर केला.

मॅल्कमने टांझानियाच्या ज्युलियस नायरे, केनियाचे जोमो केन्याट्टा, युगांडाचे मिल्टन ओबोट, घानाचे क्वेम एनक्रुमाह, गिनीचे सेकौ टौरे, इजिप्तचे गमाल अब्देल नासेर आणि अल्जेरियाचे अहमद बेन बेल्ला यांच्याशी दीर्घ चर्चा केल्या. या सर्वांनी त्याला आपल्या सरकारांमध्ये अधिकृत पदे देऊ केली.

नव्याने तयार झालेल्या पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनला भेट देणाऱ्या पहिल्या आफ्रिकन नेत्यांपैकी तो होता आणि त्याने ब्लॅक-पॅलेस्टाईन एकता प्रस्थापित केली, जी पुढे ब्लॅक पॅंथर पार्टी आणि ब्लॅक लाइव्हस मॅटर चळवळी दरम्यानही दिसली.

यापूर्वी, १९६० मध्ये त्याने हर्लेम्सच्या हॉटेल थेरेसा मध्ये क्युबाच्या फिडेल कॅस्ट्रोशी ती प्रसिद्ध भेट घेतली.

३ आणि ४ फेब्रुवारी १९६५ रोजी मॅल्कम एक्सने अलाबामा येथे भाषण केले, त्याच्या ६ ते १३ फेब्रुवारी दरम्यानच्या ब्रिटन आणि फ्रान्स दौऱ्यापूर्वी. त्याला फ्रान्समध्ये ताब्यात घेण्यात आले आणि परत विमानाने लंडनला पाठवण्यात  आले. १४ फेब्रुवारीला तो अमेरिकेत घरी परतला पण येताच त्याला कळले की आपल्या घरावर आगीचे बॉम्ब टाकले गेले होते. परंतु त्याचे कुटुंब सुरक्षित आहे हे सुनिश्चित केल्यानंतर तो व्याख्यानासाठी डेट्रॉईटला गेला.

तेथे त्याने म्हटले: “वसाहतवाद किंवा साम्राज्यवाद, ज्याला पाश्चिमात्य गुलाम व्यवस्था म्हणतात, फक्त इंग्लंड किंवा फ्रान्स किंवा अमेरिकेपुरता मर्यादित नाही. या देशातील हितसंबंध फ्रान्स आणि ब्रिटनमधील हितसंबंधांसह संधान बांधून आहेत. ही एक प्रचंड गुंतागुंत किंवा एकत्रीकरण आहे आणि यातून जे निर्माण होते ते नुसते अमेरिकन किंवा फ्रेंच सत्ता यंत्रणा म्हणून नव्हे, तर आंतरराष्ट्रीय सामर्थ्य संरचना म्हणून ओळखले जाते.

मॅल्कॉम म्हणाले की, “पाश्चात्य हितसंबंध म्हणून ओळखले जाणाऱ्या, साम्राज्यवाद, वसाहतवाद, वंशविद्वेषवाद आणि अशा सर्व नकारात्मक-वाद किंवा गिधाडी-वादां समोर जगातल्या नवीन जागृत लोकसमूहांची समस्या उभी ठेपली आहे.”

त्यानंतर एका आठवड्यानंतर, २१ फेब्रुवारी १९६५ रोजी त्याची हत्या करण्यात आली.

परिवर्तनांनी भरलेले जीवन

मॅल्कमने कधीही आपण समाजवादी असल्याचा दावा केला नाही. पण त्याचे आयुष्य परिवर्तनांनी परिपूर्ण होते.

जेव्हा त्याने अफ्रो-अमेरिकन युनिटी संघटनेच्या स्थापनेची घोषणा केली, तेव्हा मॅल्कॉम म्हणाला की त्याची ध्येय आणि उद्दिष्टे ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी सारखिच आहेत, “जो आपल्या मार्गात येईल त्याच्याशी लढा देणे, प्रथम येथे अमेरिकेत सुरुवात करून, पश्चिम गोलार्धातील आफ्रिकन वंशाच्या लोकांचे संपूर्ण स्वातंत्र्य मिळविणे, आणि कोणत्याही मार्गाने या लोकांचे स्वातंत्र्य मिळवणे. “

स्वतःला मानवाधिकार कार्यकर्ता म्हणून संबोधणारा मॅलकम समाजवादाच्या मार्गावर होता. त्याची भाषणे, विशेषत: परदेश दौऱ्यांनंतरची त्याची शेवटची भाषणे, वाचल्यावर किंवा ऐकल्यावर, आपण पाहतो की मॅल्कम या देशातील आणि जगभरातील कृष्णवर्णीय लोकांचे जीवन अत्यंत दयनीय बनवणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांच्या आणि सत्याच्या शोधात होता.

मॅल्कमने हे स्पष्ट केले की ज्या व्यवस्थेवर त्याने हल्ला केला आहे तिचा आधार होता लोभ, शोषण, एका जातीचे दुसर्‍या जातीवर आणि एका वर्गाचे दुसर्‍या वर्गावर, आणि आपले कर्तव्य केवळ त्याचे विश्लेषण करणे नव्हे, तर ते बदलणे हे आहे.

 (ग्लोरिया व्हर्डीयू या अमेरिकन समाजवादी कार्यकर्त्या आणि लेखिका आहेत.)

(हा स्वैर मराठी अनुवाद परिक्षित सामंत यांनी केला आहे. इंग्रजी लेख https://janataweekly.org/malcolm-x-a-human-rights-activist-moving-towards-socialism/ हा आहे.

Janata Weekly does not necessarily adhere to all of the views conveyed in articles republished by it. Our goal is to share a variety of democratic socialist perspectives that we think our readers will find interesting or useful. —Eds.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Email
Telegram

Contribute for Janata Weekly

Also Read In This Issue:

Chaos in Ecuador

In recent years, the surging violence in Ecuador has made international headlines. Ecuador wasn’t always this cliche of a narco-state. It was once hailed as an ‘island of peace’, a security success story. What explains its spiral into chaos?

Read More »

A New Left Party Shakes Up Germany – 2 Articles

A new political party in Germany has been launched in Germany. It aims to draw a clear line between Berlin’s belligerence towards Russia and how the weight of that stance falls most heavily on the German working class through deindustrialization and austerity.

Read More »

If you are enjoying reading Janata Weekly, DO FORWARD THE WEEKLY MAIL to your mailing list(s) and invite people for free subscription of magazine.

Subscribe to Janata Weekly Newsletter & WhatsApp Channel

Help us increase our readership.
If you are enjoying reading Janata Weekly, DO FORWARD THE WEEKLY MAIL to your mailing list and invite people to subscribe for FREE!