राम प्रसाद बिस्मिल यांच्या क्रांतीच्या कल्पनेमध्ये भगवीकरणास थारा नाही
हर्षवर्धन त्रिपाठी आणि प्रबल सरण अग्रवाल [११ जून रोजी रामप्रसाद बिस्मिल यांच्या जन्मदिवसानिमित्त प्रकाशित] रामप्रसाद बिस्मिल यांचे ‘सरफरोशी की तमन्ना’ हे गीत जनमानसामध्ये प्रसिद्ध आहे. त्यांचे नाव ‘काकोरी कटाच्या’ घटनेमुळे जनतेच्या मनावर कोरले गेले आहे. धाडसी ट्रेन-लूटीच्या या घटनेने उत्तर भारतातील क्रांतिकारी चळवळीने दिशा बदलली. तथापि उजव्या विचारसरणीने बिस्मिल यांचे पुरेपूर भगवीकरण करण्याच्या प्रयत्न केला…